पोलीस भारती पाठोपाठ महारष्ट्रात आता होमगार्ड पदाची सुद्धा भारती होणार आहे. महारष्ट्रातील सर्व जिल्हे मिळून एकूण ९७०० पदांची भारती होणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरायचे आहेत. हे अर्ज Home Guards and Civil Defence (maharashtracdhg.gov.in)
महाराष्ट्रात 9700 होमगार्ड पदांची भरती
अर्ज करण्याची प्रक्रिया
१) हे अर्ज Home Guards and Civil Defence (maharashtracdhg.gov.in) वेबसाईट वर क्लिक करावे.
होमगार्ड नोंदणी नियम व अटी
१. होमगार्ड पात्रतेचे निकष :
अ) शैक्षणिक पात्रता कमीत कमी 10 वी उत्तीर्ण (SSC)
ब) शारिरीक पात्रता
- वय 20 वर्षे पुर्ण ते 50 वर्षांच्या आत. (दि.16/08/2024 रोजी):
- उंची पुरुषांकरीता 162 से.मी. महिलांकरीता 150 से.मी.
- छाती (फक्त पुरुष उमेदवारांकरीता). (न फुगविता किमान 76 से.मी. कमीत कमी 5 सेमी फुगविणे आवश्यक).
क) आवश्यक कागदपत्र-
- रहीवासी पुरावा पुरावा – आधार कार्ड, मतदान ओळखपत्र
- शेक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र
- जन्मदिनांक पुराव्याकरीता SSC बोर्ड प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला.
- तांत्रिक अहर्ता धारण करीत असल्यास तत्सम प्रमाणपत्र. 5. खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र
- 3 महिन्याचे आतील पोलीस चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र
होमगार्ड सदस्यत्वाचे फायदे –
१. सैनिकी गणवेश परीधान करणेचा मान व विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण
२. ३ वर्षे सेवापूर्ण होमगार्डना राज्य पोलीस दल, वनविभाग, अग्निशमन दलामध्ये ५% आरक्षण.
२. प्रथमोपचार, अग्निशमन, विमोचन या सारख्या विषयांचे प्रशिक्षण घेण्याची संधी.
४. गौरवास्पद कामगिरी केल्यास विवीध पुरस्कार/पदके मिळविण्याची संधी.
५. स्वतःचा व्यवसाय/शेती इ. सांभाळत देशसेवा करण्याची संधी.