प्रकरण 1 – गुरुत्वाकर्षण – फ्री online टेस्ट आणि नोट्स
प्रकरण 1 – गुरुत्वाकर्षण – फ्री online टेस्ट आणि नोट्स – video
फ्री online टेस्ट साठी खालील लिंक वर क्लिक करा. परंतु तत्पूर्वी तुम्ही खालील नोट्स वाचू शकताय जेणेकरून तुम्हाला टेस्ट सोप्पी जाईल.
https://forms.gle/Ups5p4VxHYd2TVfd9
व्हिडियो 1
व्हिडियो 2
अभिकेंद्री बल म्हणजे काय ?
वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होते. या बलास अभिकेंद्री बल असे म्हणतात. या बलामुळे वस्तू केंद्राकडे जाण्यास प्रवृत्त होते.
केप्लरचे नियम
पहिला नियम – ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो.
दुसरा नियम – ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा, हि समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापत असते.
तिसरा नियम – सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तनकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घानाला समानुपाती असतो.
वस्तुमान म्हणजे काय?
कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यमध्ये असलेल्या द्रव्यसंचयाचे मापन होय. याचे SI एकक किलोग्राम आहे. वस्तुमान हि आदिश राशी आहे.
वजन म्हणजे काय?
एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्या बलाला वजन असे म्हणतात.