डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भारतात बहुजन समाजात सर्वाधिक उपेक्षित असा एक वर्ग होता. तो म्हणजे पूर्वापार अस्पृश्य मानल्या गेलेल्या दुर्दैवी लोकांचा वर्ग होय. या समाजावर वर्षानुवर्षे अन्याय होत होता. माणूस म्हणून जगण्याचा अधिकारही त्यांच्याकडून हिरावून घेतला गेला होता. याच उपेक्षित वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी, या वर्गाचा उद्धार करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले जीवन समर्पित केले.