दहावी बारावी बोर्ड परीक्षा २०२४ | बोर्डाची फी परत मिळणार!
दहावी बारावी बोर्ड परीक्षा २०२४ | बोर्डाची फी परत मिळणार!
नुकतीच इयत्ता दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा संपली आहे. दहावीचा शेवटचा पेपर २६ मार्च या तारखेला संपला. दहावी बारावी बोर्ड परीक्षा २०२४ साठी सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा फी भरली होती. परंतु काही विद्यार्थ्यांना ही फी बोर्डाकडून परत मिळणार आहे असे परिपत्रक बोर्डाने नुकतेच काढले आहे.
या परिपत्रकानुसार दुष्काळ ग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांना त्यांची फी परत मिळेल असे सांगण्यात आले आहे.