दहावी गणित भाग 2
प्रकरण 4 थे – भौमितिक रचना
व्हिडियो
काही महत्वाचे
खालील रचना आपण आधीच्या इयत्तांमध्येशिकलो आहोत. त्या रचनांची उजळणी करा.
दिलेल्या रेषेला तिच्या बाहेरील बिंदूतून समांतर रेषा काढणे.
दिलेल्या रेषाखंडाचा लंबदुभाजक काढणे.
त्रिकोणाच्या बाजू व कोन यांपैकी पुरेसे घटक दिले असता त्रिकोण काढणे.
दिलेल्या रेषाखंडाचेदिलेल्या संख्येएवढे समान भाग करणे.
दिलेल्या रेषाखंडाचेदिलेल्या गुणोत्तरात विभाजन करणे.
दिलेल्या कोनाशी एकरूप असलेला कोन काढणे.
इयत्तानववीत तुम्ही शाळेच्यापरिसराचा नकाशा तयार करण्याचा उपक्रम केला आहे. एखादी इमारत बांधण्यापूर्वी त्या इमारतीचा आराखडा तयार करतात. शाळेचा परिसर आणि त्याचा नकाशा, इमारत आणि तिचा आराखडा परस्परांशी समरूप असतात. भूगोल, वास्तुशास्त्र, यंत्रशास्त्र इ. क्षेत्रांमध्येसमरूप आकृत्या काढण्याची गरज असते. त्रिकोण ही सर्वांत साधी बंदिस्त आकृती आहे. म्हणून दिलेल्या त्रिकोणाशी समरूप त्रिकोण कसा काढता येतो, हे समजून घेणे गरजेचे आहे