दहावी गणित भाग 1
वर्गसमीकरणे
वर्गसमीकरण म्हणजे काय ?
ज्या एका चलांतील समीकरणात सर्व घातांक पूर्ण संख्या असून चालाचा मोठ्यात मोठा घातांक 2 असतो. ते वर्गसमीकरण असते. वर्गसमीकरणे सोडवण्याच्या तीन पद्धती आहेत. पहिली म्हणजे अवयव पद्धत. दुसरी पद्धत म्हणजे पूर्ण वर्ग पद्धत आणि तिसरी पद्धत हि सूत्र पद्धत आहे.
काही महत्वाचे मुद्दे
प्रत्येक वर्गसमीकरणाची दोन मुळे असतात.
वर्गसमीकरणाची कोटी नेहमी 2 असते. म्हणजे वर्गसमीकरणाचा सर्वात मोठा घातांक हा नेहमी 2 असतो.
वर्गसमीकरणे या प्रकरणावर सुद्धा बोर्डाच्या परीक्षेला १२ गुणांचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने हे प्रकरण महत्वाचे वाटते. या प्रकरणात एकूण 6 सरावसंच असून शेवटच्या सरावसंचात शाब्दिक गणिते आहेत. शाब्दिक गणिते सोडवताना वर्गसमीकरणे तयार करावी लागतात.