दहावी बोर्ड परीक्षा रद्द करण्याविरोधात जनहित याचिका.
गेल्या महिन्यातच महाराष्ट्र बोर्डाने इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विध्यार्थ्यांना पास करण्यात येईल असे सांगण्यात आले परंतु आज याच बोर्डाच्या आणि राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात माजी शिक्षक आणि पुणे बोर्डाचे माजी सदस्य धनंजय कुलकर्णी यांनी मुबई हाय कोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. दहावीची परीक्षा पास झाल्याशिवाय विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देवू नका. तसेच इयत्ता अकरावी च्या प्रवेश प्रक्रीयेतील गोंधळ टाळण्यासाठी आणि भ्रष्ट्राचार टाळण्यासाठी या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी मागणी या याचिकेतून धनंजय कुलकर्णी यांनी केली.
तसेच दहावीची बोर्डाची परीक्षा घेण्यात यावी अशी मुख्य मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. महाराष्ट बोर्डासोबत इतर बोर्डांना देखील या याचिकेच्या माध्यमातून आव्हान देण्यात आले आहे. यापूर्वी महाराष्ट्र बोर्डानं मागच्या महिन्यात दहावीची परीक्षा होणार नाही आणि अंतर्गत मूल्यमापन करून विद्यार्थ्यांचा निकाल लावण्यात येईल असे बोर्डाने कळवण्यात आले होते. त्या अनुषंगाने बोर्डाने पाऊले सुद्धा उचलली होती.
तसेच अकरावीचे अडमिशन कसे करावे. अकरावी प्रवेश प्रक्रिया कशी करावी या सगळ्या मुद्द्यांवर केल्या अनेक दिवसांपासून फक्त चर्चा सुरु होती. परंतु यावर अजून कुठलाही ठोस निर्णय घेतला गेला नाही. हा निर्णय होण्याच्या आधीच धनंजय कुलकर्णी यांनी ही जनहित याचिका न्यायालयाकडे केली.
#दहावीबोर्डपरीक्षा२०२१बातमी