दादोबा पांडुरंग तर्खडकर (1814- 1882)
दादोबा पांडुरंग मराठी माहिती | Dadoba Pandurang
मराठी भाषेचे व्याकरण लिहून मराठीच्या व्याकरणाचा पाया घालण्याचे कार्य ज्यांनी केले, ज्यांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हंटले जाते अशा दादोबा पांडुरंग यांचा जन्म ९ मे १८१४ साली मुंबई येथील एका वैश्य कुटुंबात झाला. दादोबा पंदुरण यांचे पूर्ण नाव दादोबा पांडुरंग तर्खडकर असे होते परंतु यांना दादोबा पांडुरंग या नावानेच ओळखले जाते.
दादोजींचे प्राथमिक शिक्षण हे निरनिराळ्या छोट्या छोट्या गांवांमध्ये झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी गाठली. आपले शिक्षण पूर्ण झाल्यावर दादोबा काही दिवस जावरा संस्थानच्या नबावाकडे त्याचे खाजगी शिक्षक म्हणून कार्यरत राहिले. त्यानंतर त्यांना एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षकाची नोकरी मिळाली. पुढे सुरत येथे सुरू करण्यात आलेल्या इंग्रजी शाळेतही त्यांनी शिक्षक म्हणून काम केले. इ. स. १८४६ मध्ये मुंबईतील ट्रेनिंग कॉलेजच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली. इ. स. १८५२ मध्ये दादोबांची डेप्युटी कलेक्टर म्हणून अहमदनगर येथे नेमणूक करण्यात आली. १८५७ साली दोडोजींनी भिल्लांचे बंड मोडून काढले. ही त्यांची खूप मोठी कामगिरी होती. या कामगिरीमुळे त्यांना सरकारने ‘रावबहाद्दूर’ हा किताब देवून त्यांचा गौरव केला.
दुर्गाराम मंछाराम यांच्या सहकायनि २२ जून १८४४ साली दादोजी पांडुरंग यांनी ‘मानवधर्म सभेची’ स्थापना केली. हिंदू धर्मात अनेक अनिष्ट प्रथा आणि चालीरीती होत्या या सर्वाना मानवधर्म सभेने विरोध केला. मूर्तीपूजेला सुद्धा मानवधर्म सभेचा विरोध होता. मानवधर्म सभेची तत्वे खालीलप्रमाणे आहेत.
(१) ईश्वर एकच असून तो पूज्य व निराकार आहे.
(२) नीतिपूर्वक सप्रेम ईश्वरभक्ती हाच धर्म होय.
(३) मनुष्यमात्राचा पारमार्थिक धर्म एकच होय.
(४) प्रत्येक मनुष्यास विचार करण्याचे स्वातंत्र्य आहे.
(५) नित्यनैमित्तिक कर्म विवेकास अनुसरून असावीत.
(६) मनुष्यमात्राची एक ज्ञाती होय.
(७) सर्वांस ज्ञानशिक्षा असावी.
मानवधर्म सभेची तत्वे अतिशय चांगली असूनही ही संस्था लवकरच संपुष्ठात आली.
मानवधर्म सभेच्या अपयशामुळे किंवा मानवधर्म सभा जास्त काळ न टिकूनही दादोबा पांडुरंग यांनी आपले काम थांबवले नाही पुढे ३० जुलै १८४९ साली राम बाळकृष्ण जयकर, भिकोबा चव्हाण, सखाराम चव्हाण यांच्या मदतीने ‘परमहंस सभा’ किंवा ‘परमहंस मंडळी’ नावाची दुसरी संस्था स्थापन केली.
परमहंस सभेची तत्त्वे सर्वसाधारणपणे मानवधर्म सभेच्या तत्त्वांसारखीच होती. ईश्वर एकच असून तो निराकार आहे, मूर्तिपूजा करू नये, विधवाविवाहास संमती असावी यांसारख्या तत्त्वांचा स्वीकार परमहंस सभेने केला होता. परमहंस सभेत जातिभेदविरोधात आचरण होत असे. तिचे सर्व सभासद प्रार्थनेसाठी एकत्र जमत असत. त्यांमध्ये सर्व जाति-धर्मांच्या लोकांचा समावेश असे. प्रार्थनेनंतर सर्व सभासद सहभोजन करीत असत. सभेच्या कामकाजाचा आरंभ करण्यापूर्वी, तसेच सभेच्या अखेरीस ज्या मराठी प्रार्थना म्हणण्यात येत असत, त्या दादोबा पांडुरंग यांनी रचल्या होत्या. परमहंस सभेची तत्त्वे विशद करण्यासाठी दादोबांनी ‘पारमहंसिक ब्राह्मधर्म’ या नावाचा एक काव्यग्रंथ लिहिला होता. त्यामध्ये त्यांनी जातिभेद सोडावा, सर्वांशी बंधुभावाने बागावे, निराकार ईश्वराची पूजा करावी,
सामाजिक व धार्मिक सुधारणेसंबंधी तळमळ वाटत होती; परंतु त्यासंबंधीच्या कृतीतून सनातनी व कर्मठ मंडळींचा जो रोष ओढविला असता त्याला तोंड देण्याइतपत धैर्य त्यांच्या अंगी नव्हते. म्हणून सभासदांनी या सभेच्या कामकाजाची जाहीर वाच्यता करू नये, असा संकेतच ठरविण्यात आला होता. संघटनेच्या वरील पद्धतीच्या स्वरूपामुळे तिच्या वाढीवर बऱ्याच मर्यादा पडाव्यात यात आश्चर्य मानण्यासारखे काहीच नव्हते. तशातच १८६० मध्ये कोणीतरी या सभेच्या सभासदांची यादी चोरून ती प्रसिद्ध केली. त्याबरोबर सभासदांत व समाजातही मोठीच खळबळ माजली. लोकक्षोभास तोंड देण्याचा प्रसंग सभासदांवर ओढवला, त्यामुळे परमहंस सभेच्या धुरिणांनी ही संघटना बरखास्त करण्याचा निर्णय घेतला.
मृत्यू: १७ ऑक्टोबर, १८८२.