इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा 2023 | Hall Ticket सोमवार पासून मिळणार
इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा 2023 | Hall Ticket सोमवार पासून मिळणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २ मार्च पासून बोर्डाच्या परीक्षेचे आयोजन केलेले आहे. या परीक्षेसाठीचे वेळापत्रक बोर्डाने आपल्या संकेतस्थळावर अपलोड केलेले आहे. २ मार्च ला सुरु होणारी परीक्षा २५ मार्च ला संपेल. बोर्डाकडून घेण्यात येणाऱ्या या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र सोमवार, ६ फेब्रुवारीपासून ऑनलाइन उपलब्ध होणार आहे.
https://www.mahasscboar d.in/ या संकेतस्थळावर शाळा लॉगिनमध्ये प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाईल. प्रवेशपत्र डाऊनलोड करून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून, स्वाक्षरी करून प्रत विद्यार्थ्यांना द्यावी. प्रवेशपत्रात विषय माध्यम बदल असल्यास, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यी मराठी माध्यमाचा असेल आणि त्याच्या प्रवेश पत्रावर माध्यामाच्या नावाचा उल्लेख असेल तर अशा दुरुस्ती शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करावयाच्या आहेत. प्रवेशपत्रावरील फोटो, सही, विद्यार्थ्यांचे नाव या संदर्भातील दुरुस्ती शाळांनी त्यांच्या स्तरावर करून त्याची प्रत विभागीय मंडळात सादर करायची आहे. प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून हरवल्यास झाल्यास पुन्हा प्रत घेऊन त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत, असे नमूद करावे. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिकटवून मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे.