इयत्ता आठवी – प्रकरण 3 –
इयत्ता आठवी – प्रकरण 3 – ब्रिटिश सत्तेचे परिणाम
या प्रकरणावरील online test देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://forms.gle/PLzRPXC9r2AdkFMn7
स्वाध्याय
अ) रिकाम्या जागा भरा
1) पोर्तुगीज, डच , फ्रेंच, ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्तास्पर्धेत उतरले
2) १८०२ मध्ये दुसरा बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला
3) जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला.
आ) पुढील संकल्पना स्पष्ट करा.
1) मुलकी नोकरशाहि – भारतात इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती. लॉर्ड कॉर्नवालिस याने नोकरशाहीची निर्मिती केली. मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्त्वाचा घटक बनला. प्रशासनाच्या सोईसाठी त्याने इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी केली. जिल्हाधिकारी हा जिल्हा शासनाचा प्रमुख असे. महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता व सुव्यवस्था राखणे ही त्याची जबाबदारी असे. अधिकाऱ्यांची भरती इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस (आय.सी.एस.) या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जाऊ लागली.
2) शेतीचे व्यापारीकरण – पूर्वी शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असत. हे अन्नधान्य त्यांना घरच्या वापरासाठी व गावाची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडत असे. कापूस, नीळ, तंबाखू, चहा इत्यादी नगदी पिकांना इंग्रज सरकार उत्तेजन देऊ लागले. अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारी व्यापारी पिके घेण्यावर जो भर दिला जाऊ लागला, त्या प्रक्रियेला ‘शेतीचे व्यापारीकरण’ असे म्हणतात.
3) इंग्रजांची आर्थिक धोरण – इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र होते. औद्योगिक क्रांतीमुळे तेथे भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली होती. या व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली. त्यामुळे इंग्लंडचा आर्थिक लाभ झाला; परंतु भारतीयांचे मात्र आर्थिक शोषण होऊ लागले.
इ) पुढील विधाने स्पष्ट करा
1) भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले.
उत्तर – नव्या जमीन महसूलव्यवस्थेचे अनिष्ट परिणाम ग्रामीण जीवनावर झाले. शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला शेतकरी पीक विकू लागले. व्यापारी व दलाल वाजवीपेक्षा कमी दराने त्यांचा माल खरेदी करू लागले. प्रसंगी शेतकऱ्यांना सारा भरण्यासाठी सावकाराकडे जमीन गहाण टाकून कर्ज घ्यावे लागे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले.
(२) भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला.
उत्तर – भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर आकारत असे. उलट इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारण्यात येई. तसेच इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रावर तयार झालेला असे. त्यामुळे त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात व कमी खर्चात होई. अशा स्वस्त मालाशी स्पर्धा करणे भारतीय कारागिरांना कठीण झाले. परिणामी भारतातील पारंपरिक उद्योगधंदे बंद पडले व अनेक कारागीर बेकार झाले.