अकरावी प्रवेश प्रक्रिया यावर्षी online होणार | 11th Admission Online Form
अकरावी प्रवेश प्रक्रिया यावर्षी online होणार | 11th Admission Online Form
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. आता इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया (11th Admission) 19 मे पासून सुरु होणार आहे.
दरवर्षी ही प्रवेश प्रक्रिया मुंबईसह, पुणे, छत्रपती संभाजी नगर, अमरावती, नागपूर, पिंपरी आणि चिंचवड या महानगर पालिका क्षेत्रात अकरावी प्रवेश प्रक्रिया online पद्धतीने होत होती. परंतु यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात ही प्रवेश प्रक्रिया online पद्धतीने होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. ही online प्रवेश प्रक्रिया टप्प्याटप्प्याने होणार आहे. पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 ते 25 तारखेदरम्यान मुलांना https://mahafyjcadmissions.in/ संकेत स्थळावर जाऊन नाव नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी विद्यार्थ्याचे नाव, त्याचा परीक्षा क्रमांक, मोबाईल नंबर आधार कार्ड इत्यादी माहिती भरून पासवर्ड सेट करावा लागेल. यानंतर पुढे 25 तारखेनंतर पुढची प्रक्रिया सुरु होईल.

प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असणारी सर्व महत्वाची कागदपत्रे
- शाळा सोडल्याचा दाखला
- आधार कार्ड
- गुणपत्रिका
- जातीचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी दाखला