अकरावी CET परीक्षेचा फॉर्म कसां भरायचा? CET चा फॉर्म भरण्याच्या पायऱ्या कोणत्या? जाणून घ्या !
अकरावी CET परीक्षेचा फॉर्म कसां भरायचा? CET चा फॉर्म भरण्याच्या पायऱ्या कोणत्या? जाणून घ्या !
प्रवेश अर्जाची प्रक्रिया आणि पायऱ्या खालील प्रमाणे असतील
पायरी 1 – सर्वात आधी खालील लिंक वर क्लिक करा.
पायरी 2 – या लिंक वर क्लिक केल्यावर आपला बैठक क्रमांक – Seat Number – Hall Ticket Number – टाका
पायरी 3 – दोन पर्याय असतील – परीक्षा द्यायची किंवा नाही – यापैकी योग्य तो पर्याय निवडा
पायरी 4 – सबमिट करा
पायरी 5 – तुमची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली.. धन्यवाद
नुकताच इयत्ता दहावीचा महाराष्ट्र बोर्डाचा निकाल लागला. हा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर लावण्यात आला होता. हा निकाल जाहीर झाल्यावर आता अकरावी च्या प्रवेशासाठी CET म्हणजे सामायिक प्रवेश परीक्षा होणार आहे. ही परीक्षा OMR पद्धतीने होणार असून 100 गुणांची बहुपर्यायी प्रश्न या प्रश्नपत्रिकेत असतील. 20 जुलै पासून राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. अर्ज करण्याची पद्धत अतिशय सोप्पी आहे.
या परीक्षेसाठी महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचे शुल्क अकरावे लागणर नाही. तसेच त्याना ही परीक्षा द्यायची आहे की नाही एवढीच माहिती संकेत स्थळावर भरावी लागेल. या परीक्षेसाठी महाराष्ट्र बोर्डाच्या मुलांना जरी शुल्क भरावे लागणार नसले तरी इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मात्र १७० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
