CET – परीक्षेत OMR उत्तरपत्रिकेत गोल कशाने करायचे, काळ्या पेनाने, निळ्या पेनाने की पेन्सिलीने
CET – परीक्षेत OMR उत्तरपत्रिकेत गोल कशाने करायचे, काळ्या पेनाने, निळ्या पेनाने की पेन्सिलीने?
यावर्षी इयत्ता अकरावी च्या वर्गांच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सामाईक प्रवेश परीक्षा (CET) होणार आहे. या महिन्यात 26 जुलै पासून या परीक्षेसाठी प्रवेश प्रक्रिया online पद्धतीने सुरु झाली पण आहे. 02 ऑगस्ट पर्यंत ही प्रवेश प्रक्रिया सुरु असेल आणि 21 ऑगस्ट 2021 या तारखेला सकाळी 11:00 ते दुपारी 1:00 दरम्यान होणार आहे.
ही परीक्षा बहुपर्यायी स्वरुपाची असून या परीखेत 100 गुणांसाठी 100 प्रश्न विचारले जाणार आहेत. परीक्षेत उत्तरपत्रिका OMR म्हणजे Optical mark recognition पद्धतीची असेल ज्यामध्ये तुम्हाला गोल भरायचे आहेत. आता हे गोल नेमके कशाने भरायचे? तर या संदर्भात बोर्डाने काही सूचना केल्या आहेत.
गोल कसे आणि कशाने भरायचे या संदर्भात बोर्डाने खालील मार्गदर्शक सूचना आपल्या प्रकटना मध्ये दिल्या आहेत.
1) गोल काळ्या किंवा निळ्या यापैकी कोणत्याही एकाच प्रकारच्या बॉल पेन ने भरावे. तसेच सदर पर्यायी उत्तराच्या वर्णक्षराचा गोल पूर्णपणे (गडद) भरण्याची दक्षता घ्यावी.
2) अर्धवट भरलेला, खाडाखोड केलेला, एकापेक्षा जास्त भरलेले गोल तसेच गोलात अंक अथवा तद्सम मजकूर लिहिलेला असेल तर असे प्रश्न उत्तरासाठी ग्राह्य धरले जाणार नाही.