11th Admission 2025 Link | Maharashtra Board | अकरावी प्रवेश प्रक्रिया 2025

11th Admission 2025 Link | Maharashtra Board | अकरावी प्रवेश प्रक्रिया 2025
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ कडून घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा नुकताच निकाल लागला. दहावीचा निकाल लागल्यावर उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची अकरावीच्या ऍडमिशन साठी मोठी लगबग सुरू झाली आहे.
यंदा इयत्ता अकरावीच्या ऍडमिशन ची प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे. दहावीचा निकाल लवकर लागल्यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही लवकर सुरू होत असून ही प्रक्रिया 19 मे पासून सुरू होणार आहे. अकरावीपासून विद्यार्थ्यांना https//11thadmissiom.org.in/ या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना अकरावी च्या ऍडमिशन साठी फॉर्म भरता येणार आहे .

या प्रक्रियेत 19 ते 28 मे 2025 दरम्यान विद्यार्थ्यांना आपले ऑनलाईन प्रोफाईल तयार करता येणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना आपली वैयक्तिक माहिती. नाव, मार्क, मोबाईल नंबर इ. माहिती भरावी लागणार आहे. यानंतर पासवर्ड सेट करून विद्यार्थी आपली प्रोफाइल तयार करू शकतात.
दरवर्षी अकरावी साठी मुंबई, पुणे, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या महानगरपालिका क्षेत्रातील महाविद्यालयांत प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने होत होती. परंतु यावर्षी ही प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातील महाविद्यालयांसाठी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.