दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा 2022 वेळापत्रक जाहीर – आत्ताच डाऊनलोड करा वेळापत्रक – SSC / HSC Maharashtra Board Exam 2022 Timetable

इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा 2022 वेळापत्रक जाहीर – आत्ताच डाऊनलोड करा वेळापत्रक

SSC / HSC Maharashtra Board Exam 2022 Timetable

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून इयत्ता दहावी आणि बारावीच्या वेळापत्रकाच्या तारखा नुकत्याच जाहीर झाल्या आहेत इयत्ता बारावीची परीक्षा 4 मार्च 2022 ला सुरु होणार असून इयत्ता दहावीची परीक्षा 15 मार्च 2022 ला सुरु होणार आहे. खालील दुव्यांवर क्लिक करून तुम्ही इयत्ता दहावी आणि बारावीचे वेळापत्रक डाऊनलोड करू शकता.

इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा 2022 – वेळापत्रक

दिनांकवारविषयवेळ
15 मार्च 2022मंगळवारमराठी – प्रथम भाषा 10:30 ते 2
16 मार्च 2022बुधवार मराठी – तृतीय व द्वितीय भाषा 10:30 ते 2
19 मार्च 2022शनिवार इंग्रजी 10:30 ते 2
21 मार्च 2022 सोमवार हिंदी– संयुक्त – 40 गुण10:30 ते 12:45
21 मार्च 2022सोमवार हिंदी– संपूर्ण – 80 गुण10:30 ते 2
22 मार्च 2022मंगळवारसंस्कृत– संपूर्ण – 80 गुण 10:30 ते 2
22 मार्च 2022मंगळवार संस्कृत– संयुक्त– 40 गुण 3:00 ते 5:15
24 मार्च 2022गुरुवार गणित भाग 110:30 ते 12:45
26 मार्च 2022 शनिवार गणित भाग 2 10:30 ते 12:45
28 मार्च 2022सोमवार विज्ञान भाग 110:30 ते 12:45
30 मार्च 2022बुधवार विज्ञान भाग 2 10:30 ते 12:45
1 एप्रिल 2022शुक्रवार इतिहास आणि राज्यशाश्त्र 10:30 ते 12:45
4 एप्रिल 2022सोमवारभूगोल10:30 ते 12:45

बोर्ड परीक्षेला जाण्यापूर्वी आपल्या शाळेतील वेळापत्रक बघून खात्री करून घ्या

इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा 15 मार्च ला सुरु होणार असून 4 एप्रिल ला संपणार आहे. 15 मार्च ला सकाळी 10:00 ते 2 दरम्यान पहिला मराठी विषयाचा पेपर असणार असून शेवटचा पेपर हा भूगोलाचा असेल. सन २०२१ ची इयत्ता दहावी बोर्डाची परीक्षा पूर्णपणे रद्द करून अंतर्गत मूल्यमापन करून इयत्ता निकाल जाहीर झाला होता. त्याआधी 2020 मध्ये इयत्ता दहावीचा शेवटचा भूगोल पेपर रद्द झाला होता. परंतु यावर्षी इयत्ता दहावीची परीक्षा नियमित होणार आहे.

दहावी बारावी बोर्ड परीक्षा महत्वाची अपडेट | परीक्षा कधी होणार? वेळापत्रक कधी मिळणार? 2022

दहावी बारावी बोर्ड परीक्षा महत्वाची अपडेट | परीक्षा कधी होणार? वेळापत्रक कधी मिळणार? परीक्षा online की ऑफलाईन

दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यावर मंडळाचा भर देणार आहे. 2021 – 22 या शैक्षणिक वर्षातील दहावी बारावीचं वेळापत्रक दिवाळीनंतर जाहीर होणार आहे . राज्य माध्यमिक मंडळातील सूत्रांनी अशी माहिती दिली आहे. जर येत्या काळात कोरोना पुन्हा वाढल्यास ऑनलाईन परीक्षेची चाचपणी करण्याची भूमिका असेल.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यात होत असतात. यावर्षी कोरोनाची लाट थोडी ओसरल्यामुळे या परीक्षा वेळेवर होण्याची चिन्हे दिसत आहेत. तरीही परीक्षा नेमकी कधी असेल याची निश्चित तारीख दिवाळीनंतर आपल्याला समजेल.. त्यामुळे परीक्षेच्या वेळापत्रकासाठी आपल्याका काही दिवस वात पहावी लागेल…