दहावी गणित | Board Exam 2023 IMP | बोर्डाला आलेले प्रश्न | महत्वाचे प्रश्न

दहावी गणित | Board Exam 2023 IMP | बोर्डाला आलेले प्रश्न | महत्वाचे प्रश्न

नमस्कार मित्रानो या पानावर इयत्ता दहावी गणित भाग एक आणि भाग दोन या विषयांच्या महत्वाच्या गणिताच्या व्हिडियो तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. खालील बटानांवर क्लिक क्लिक करून तुम्ही सर्व व्हिडियो बघू शकता.

लवकरच पुढील व्हिडियो येथे अपडेट केल्या जातील.

यावर्षी मार्च २०२३ ची बोर्डाची परीक्षा २ मार्च २०२३ पासून सुरु होणार असून २५ मार्च २०२३ रोजी संपणार आहे. गणित भाग १ विषयाचा पेपर ४० गुणांचा तर गणित भाग २ या विषयाचा पेपर ४० गुणांसाठी असणार आहे. अशाप्रकारे लेखी परीक्षा ८० गुणांची असणार असून २० गुण हे अंतर्गत मूल्यमापनाचे असणार आहे. गणित भाग १ या विषयावर १० गुण तर गणित भाग २ साठी १० गुण असतील. यामध्ये बहुपर्यायी प्रश्न आणि गृहपाठ मिळून २० गुण असतील. बहुपर्यायी प्रश्नांसाठी १० गुण तर गृहपाठासाठी १० गुण असतील. यामुळे आपले गृहपाठ आणि गृहपाठाच्या वह्या पूर्ण करून ठेवा जेणेकरून गृहपाठात आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळतील. तसेच लेखी परीक्षेसाठी जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव करा.

दहावी गणित भाग 2 – व्हिडियो

दहावी गणित भाग 2 – व्हिडियो

नमस्कार मित्रांनो खालील बटनांवर क्लिक करून तुम्ही तुम्हाला आवश्यक असणाऱ्या प्रकरणांच्या व्हिडियो बघू शकता.

दहावी गणित भाग 1 आणि 2 मिळून 80 गुणांसाठी बोर्डाची परीक्षा असते. यासाठी गणित भाग 2 वर 40 गुणांचा लेखी पेपर होईल. आणि गणित भाग 2 साठी 40 गुण असतील. 20 गुण हे अंतर्गत मूल्यमापनासाठी असतात. यासाठी प्रकारानिहाय गुनाविभागणी केलेली असते. गणितात सगळ्यात जास्त गुण मिळवण्यासाठी वरील व्हिडियो बघणे गरजेचे आहे. वरील लिंक वर क्लिक करुन संबंधित प्रकरणांच्या सर्व सरावसंचांच्या व्हिडियो तुम्ही पाहू शकताय. एकदम फ्री मध्ये. नक्कीच सर्व व्हिडियो पहा तुम्ही. २०२१ च्या बोर्डाच्या परीक्षेसाठी गणित भाग 2 चे प्रकरण 7 वे महत्त्वमापन हे वगळण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणावर २०२१ च्या बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न विचारले जाणार नाही.      

दहावी गणित भाग 1 सर्व धड्यांच्या व्हिडियो

दहावी गणित भाग 1 सर्व धड्यांच्या व्हिडियो

नमस्कार मित्रांनो दहावी गणित भाग 1 मधील सर्व प्रकरणांच्या विडीयो खालील बॉक्स वर क्लिक करून पाहू शकता.

प्रकरण 1 : दोन चालांतील रेषीय समीकरणे

प्रकरण 2 : वर्गसमीकरणे

प्रकरण 3 : अंकगणिती श्रेढी

प्रकरण 4 : अर्थनियोजन

प्रकरण 5 : संभाव्यता

प्रकरण 6 : सांख्यिकी – लवकरच अपलोड होईल

दहावी गणित भाग 1 या विषयाचा पेपर बोर्डाच्या परीक्षेला ४० गुणांसाठी असतो. या पेपर च्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.

प्रश्न 1 ला A) बहुपर्यायी प्रश्न (४ गुण )

प्रश्न 1 ला B) एक गुणांचे ४ प्रश्न (४ गुण)

प्रश्न 2 रा A) कोणत्याही 2 कृती पूर्ण करा. (४ गुण)

प्रश्न 2 रा B) कोणतेही चार प्रश्न सोडवा (8 गुण)

प्रश्न 3 रा A) एक कृती पूर्ण करा (3 गुण )

प्रश्न 3 रा B) कोणतेही 2 प्रश्न सोडवा (6 गुण )

प्रश्न ४ था : कोणतेही 2 प्रश्न सोडवा (8 गुण )

प्रश्न 5 वा : एक प्रश्न सोडवा (3 गुण )

दहावी गणित भाग 2 – प्रकरण पहिले – समरूपता – व्हिडियो आणि online test

दहावी गणित भाग 2

प्रकरण पहिले – समरूपता

महत्वाचे गुणधर्म –

गुणधर्म 1 – दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तराएवढे असते.

गुणधर्म 2 – समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात.

गुणधर्म 3 – समान लांबीच्या पायांच्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात.

गुणधर्म 4 – पाया आणि उंची समान असेल तर त्यांची क्षेत्रफळे सारखी असतात

प्रमाणाचे मुलभूत प्रमेय – त्रिकोणाच्याएका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्याउरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूंत छेदत असेल, तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते.

कोनादुभाजाकाचे प्रमेय – त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबींच्या गुणोत्तरात विभागतो.

त्रिकोणांच्या समरूपतेच्या कसोट्य –

दोन त्रिकोण समरूप असण्यासाठी त्यांच्या तिन्ही संगत बाजू प्रमाणात असणेआणि तिन्ही संगत कोन एकरूप असणेआवश्यक असते; परंतु या सहा अटींपैकी तीन विशिष्ट अटींची पूर्तता झाल्यास उरलेल्या अटींची पूर्तता आपोआप होते; म्हणजेदोन त्रिकोण समरूप होण्यासाठी तीनच विशिष्ट अटी पुरेशा असतात. या तीन अटी तपासून दोन त्रिकोण समरूप आहेत का हेठरविता येते. अशा पुरेशा अटींचा समूह म्हणजेच समरूपतेच्या कसोट्याहोत. म्हणून दोन त्रिकोण समरूप आहेत का हे ठरवण्यासाठी त्या विशिष्ट अटी तपासणे पुरेसे असते.

समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे – जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तराएवढे असते