बोर्ड परीक्षा २०२३ | सर्वात मोठा निर्णय | कॉपी रोखण्यासाठी विशेष उपाय

बोर्ड परीक्षा २०२३ | सर्वात मोठा निर्णय | कॉपी रोखण्यासाठी विशेष उपाय

बोर्डाच्या परीक्षेमध्ये सर्रासपणे होणारी कॉपीची प्रकरणे कशी रोखायची यासाठी बोर्डाने शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून एक कृती कार्यक्रम मागवलेला आहे. बोर्डाच्या परीक्षेमध्ये होणाऱ्या कॉपी प्रकरणाला आळा घालण्यासाठी हा कृती कार्यक्रम आखला जाईल. बोर्डाच्या परीक्षेत अनेक ठिकाणी सर्रासपणे कॉपी ची प्रकरणे घडत असलेली आपल्याला बघायला मिळतात. हेच प्रकार कसे रोखायचे याविषयी आता शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांकडून बोर्डाने आता कृती कार्यक्रमाची विचारणा केली आहे. बोर्ड परीक्षेमध्ये होणाऱ्या कॉपी प्रकरणाला आळा घालण्यासाठी बोर्डाने आता कठोर पाऊले उचलायला सुरुवात केली आहे.

हा कृती कार्यक्रम म्हणजे बोर्डाच्या परीक्षेत कॉपी कशी रोखता येईल हे आता शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनीच सांगायचं आहे. यासाठी बोर्डाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर तशी अपडेट केली आहे. संकेत स्थळावर बोर्डाने एक गुगल फोर्म दिलेला आहे. तो गुगल फॉर्म भरून यासंदर्भात आपल्या कृती आणि बोर्ड परीक्षेत होणारी कॉपी प्रकाराने रोखण्यासाठी तुम्हाला सुचलेल्या उपाययोजना या फोर्म मध्ये भरून तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे. सर्व स्थरांकडून आलेल्या उपाययोजना आणि कृती कार्यक्रम पाहण्यासाठी एक तज्ञ लोकांची समिती निवडलेली आहे. ही समिती हे कृती कार्यक्रम पाहिल आणि यातले योग्य असे दहा कृती कार्यक्रम निवडले जातील आणि या दहा कृती कार्यक्रमांची अंमलबजावणी यावर्षी होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेत केली जाईल.

SSC-HSC Board Exam 2023

दरवर्षी बोर्ड काही भरारी पथकांची निवड करते. ही भरारी पथके कॉपी प्रकरणांवर आळा घालण्याचा प्रयत्न करत असतात. यावर्षी सुद्धा अशी भरारी पथके असणार आहेत आणि या भरारी पथकांसोबत दहा कृती कार्यक्रमांची सुद्धा अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे यावर्षी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करून पेपर ला जाणे गरजेचे आहे. कुठल्याही प्रकारची कॉपी करण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा विद्यार्थी अडचणी सापडण्याची शक्यता आहे.

पालकांना आणि शिक्षक तसेच विद्यार्थ्यांना या कृती कार्यक्रमाच्या स्पर्धेत सहभागी व्हायचे असेल तर आपण बोर्डाच्या संकेतस्थळावर जाऊन सहभाही होऊ शकता. यासाठी संकेतस्थळावर एक विशेष लिंक बनवण्यात आली आहे. या लिंक वर जाऊन तुम्ही या स्पेधेचे नियम आणि अटी बघू शकता आणि गुगल फोर्म भरून तुमच्या सुचना आणि तुम्हाला सुचलेल्या उपाययोजना तुम्ही बोईर्दल कळवू शकता आणि स्पर्धेत सहभागी होऊ शकता.

इयत्ता बारावीची (HSC Board Exam 2023) बोर्डाची परीक्षा २१ फेब्रुवारी तर इयत्ता दहावीची (SSC Board Exam 2023)  बोर्डाची परीक्षा २ मार्च पासून सुरु होणार आहे.

दहावी – बारावी  बोर्ड परीक्षा वेळापत्रक (SSC – HSC Board Exam Timetable)