वेळेचे नियोजन कसे करावे? 8 जबरदस्त टिप्स

संत कबीर म्हणतात,

कल करे सो आज कर | आज करे सो अब ||

पल भर मे प्रलय होयेगा | बहुरी करेगा कब ||

म्हणजे उद्या जे काम करायचं आहे ते आजच करा आणि आज करायचं काम आत्तच करा. मित्रांनो वेळ खूप महत्वाची आहे, कारण जगात सर्वकाही परत मिळवता येत परंतु गेलेली वेळ आपण परत नाही आणू शकत. तुमच्याकडे वेळ आहे तर सर्वकाही आहे. वेळेची भेळ करणाऱ्याच्या आयुष्याचा आणि नियोजनाचा कधीच ताळमेळ नाही बसत.

समजा तुमच्या बँकेतील खात्यात दररोज सकाळी दहा हजार रुपये जमा होतात. तुम्ही त्यातील कितीही पैसे दिवसभरात खर्च करू शकतात. परंतु दिवसाच्या शेवटी तुमचा balance शून्य रुपये होणार. दुसऱ्या दिवशी परत दहा हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होणार. आता मला सांगा तुम्ही रोज किती रुपये खर्च कराल? तुम्ही या दहा हजार रुपयांमधील जास्तीत जास्त रक्कम कशी वापरता येईल याचाच विचार कराल ना?

मित्रांनो आपल्या खात्यात असे पैसे जरी जमा होत नसले तरी तुमच्या आयुष्याच्या खात्यात रोज 24 तास म्हणजे 1440 मिनिटे 86400 सेकंद जमा होतात. याचा आपण किती काटेकोरपणे वापर करतो आपण? कधी विचारलाय का स्वतःला प्रश्न कि मी खरच माझा वेळ योग्य वापरतो काय दररोज? आपण किती वेळेचे नियोजन करतो? कि आपल्याला वेळेचे नियोजन करायला नाही जमत अजून? घाबरू नका मी तुम्हाला वेळेचे नियोजन करण्याच्या दृष्टीने 8 महत्वाचे मुद्दे सांगत आहे. या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही नियोजन केले तर तुम्हाला खूप फायदा होईल.

वेळेच्या नियोजनासाठी 8 टिप्स

  1. उद्या काय करायचे आहे याचा time-table आजच बनवा आणि उद्या सकाळपासून उठल्या उठल्या या वेळापत्रकाप्रमाणे कामाला लागा.
  2. दररोज आपला वेळ कुठे कुठे वाया जातो याची एक यादी बनवा. या यादीतील कोणकोणत्या बाबींवरील वेळ कमी करता येईल याचा विचार करा.
  3. प्रत्येक काम दिलेल्या किंवा नियोजित वेळेवर करा. वेळेवर नाही झाले तर अतिरिक्त ताण येऊ शकतो आणि पुढील कामे होत नाही. विनाकारण विचार करण्यात आणि ताणतणावात वेळ वाया जातो.
  4. वेळेच्या व्यवस्थापनाची साधने वापरा. उदा. घड्याळ, कॅलेंडर, वेळापत्र
  5. कोणत्याची गोष्टींची वाट बघण्यात वेळ घालवू नका.
  6. रिकाम्या वेळेचा सदुपयोग करा.
  7. एका वेळेस एकच काम करा.
  8. दिवसभरातील कामाचा आढावा घ्या. आपल्या वेळेचे नियोजन व्यवस्थित झाले कि नाही याचे विश्लेषण करा.
  • महेंद्र दशरथ घारे
mahendrasfsep: