Uncategorized

अभ्यास कसा करायच्या? ७ जबरदस्त टिप्स | Study Tips

अभ्यास कसा करायच्या? ७ जबरदस्त टिप्स | Study Tips

जगातील प्रत्येक मुलाच्या आईबाबांना वाटतं कि माझ्या मुलाने खूप शिकून मोठं व्हाव. माझ्या मुलाने किंवा मुलीने खूप अभ्यास करावा. आपल्या शाळेतील सर्व शिक्षक, आपले मामा – मामी, काका – काकी, शेजारी – पाजारी सगळे सांगतात की अभ्यास करा. अभ्यास केल्यामुळे भविष्य उज्वल होते, अभ्यास केल्यामुळे खूप फायदा होतो. पण हा  अभ्यास कसा करायचा हे मात्र कधी कोणी सांगत नाही. आपण आज मी तुम्हाला अभ्यास कसा करायचा हे सागणार आहे. त्यामुळे आता काळजी करू नका. आज आपण study टिप्स बघुयात.

पहिली टिप्स – अभ्यासाची जागा

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली अभ्यासाची जागा. आपण अभ्यास कुठं करतोय हे महत्वाचे आहे. अभ्यासाची जागा खूप महत्व्ची आहे. आपण घरात जिथे अभ्यास करतो ती जागा स्वच्छ असावी, तिथे कुठल्याही प्रकारचा कचरा नकोय, तिथे वस्तू, वह्या, शैक्षणिक साहित्य अस्ताव्यस्त पडलेले नको. ती जागा एकदम शांत असावी, आजूबाजूला गोंधळ नकोय. टीव्ही तर नकोच तिथे.

दुसरी टिप्स – अभ्यासाची वेळ

अभ्यासाची वेळ खूप महत्वाची आहे मित्रांनो, तुम्ही कोणत्या वेळेला अभ्यास करता हे यावरून तुम्ही केलेला अभ्यास किती लक्षात राहील असं काही लोक म्हणतात. कोण म्हणत पहाटे पहाटे अभ्यास केल्यावर लक्षात राहत तर कोणाला रात्री अभ्यास करायला आवडतं. मग आपल्यासमोर प्रश्न पडतो की अभ्यास करायचा तरी कधी? तर मित्रांनो तुम्ही कोणत्या वेळी अभ्यास केल्यावर तुमच्या लक्षात राहतो. हे आधी समजून घ्या. ही वेळ सकाळ असेल, दुपार असेल किंवा संध्याकाळ. लोकं काय म्हणतात यावर लक्ष देऊ नका. कारण कुछ तो लोग कहेगे लोगो का काम है केहना. तुम्ही रात्री अभ्यास केल्यावर तुमच्या लक्षात राहत असेल तर रात्री अभ्यास करा, सकाळी लक्षात राहत असेल तर सकाळी करा. कोई बात नही बेटा. लेकीन अपने निर्धारित समय मै पढाई मी लगे रहो |

टिप्स नंबर ३ – वेळेचे नियोजन

तुम्ही तुमच्या निर्धारित किंवा ठरवलेल्या वेळेवर अभ्यास करा, परंतु हा अभ्यास करत असताना कोणत्या विषयाचा अभ्यास किती वेळ करायचा? कधी करायचा हे महत्वाचे आहे. आठवड्याभरात तुमचा सर्व विषयांचा थोडा थोडा तरी अभ्यास करावा. नाहीतर आठवडाभर एकाच विषयाचा अभ्यास करत राहिलात की मग आपलं कामच कठीण होऊन जायचं ना. म्हणून ठरवा कि कोणत्या वारी कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा? म्हणजे आपल्या अभ्यासाचे वेळापत्रक बनवा.

टिप्स नंबर ४  – मित्रांसोबत चर्चा

मित्रांनो हिंदी मध्ये एक म्हण आहे – ‘एक सर से दो सर बेहतर, दो सर से तीन सर और ज्यादा बेहतर’ म्हणून मित्रांनो आपल्या मित्रांसोबत अभ्यासावर नेहमी चर्चा करा. एकत्र मिळून मिसळून सोबत बसून अभ्यास करा. कारण चर्चेतून केलेला अभ्यास लक्षात राहतो, डोक्यात एकदम फिट बसतो. म्हणून – चर्चा तो होनी चाहिये, लेकीन पढाई की – कुछ समझे?

टिप्स नंबर ५ – तुकडे – तुकडे करून अभ्यास करा

तुकडे तुकडे म्हणजे सलग अभ्यास करून नका. मध्ये मध्ये ब्रेक घ्या. २५ मिनिटे अभ्यास आणि नंतर ५ मिनिटांचा ब्रेक घ्या. या ब्रेक मध्ये थोडं चाला, एखाद चांगल गाणं ऐका किंवा आपले काही छंद असतील तर ते जोपासा. म्हणजे कोणाला बासरी वाजवायला आवडत असेल तर बासरी वाजवा, किंवा इतर काही.

टिप्स नंबर ६ – धडे वाचून नोट्स कशा काढायच्या

पुस्तकं वाचणे हे खूप महत्वाचे आहे. प्रत्येक धडा दोन ते तीन वेळा वाचून व्हायला हवा. धडे वाचता वाचता आपण आपल्या स्वतः च्या नोट्स काढा. या नोट्स परीक्षेचा अभ्यास करण्यास उपयुक्त ठरतात. धडा वाचताना आपल्या हातात पेन्सिल ठेवावी. वाचता वाचता महत्वाचे वाटणारे मुद्दे आणि शब्द याच्याखाली रेषा मारा. आणि संपूर्ण धडा वाचून झाल्यावर जिथे जिथे रेषा मारल्या आहेत ते सर्व मुद्दे एका वहीत लिहून घ्या. झाल्या तुमच्या नोट्स तयार. कित्ती सोप्प आहे न हे?

टिप्स नंबर ७ – सतत उजळणी करा

मित्रांनो उजळणी हा आपल्या अभ्यासाचा खूप महत्वाचा भाग आहे. सतत उजळणी करत रहा. तुम्ही आठवडाभर जो अभ्यास कराल त्या सर्व अभ्यासाची उजळणी आठवड्याच्या शेवटी म्हणजे दर रविवारी करू शकता. तसेच महिन्याच्या शेवटी महिनाभर केलेल्या अभ्यासाची उजळणी करायला विसरू नका. उजळणी नाही केली तर आपण विसरून जाऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *