Board / BoardExam / education / exam / SSC / SSC Board Question Paper / timetable / Uncategorized

दहावी – बारावी बोर्ड परीक्षा २०२३  वेळापत्रक | SSC / HSC Maharashtra Board 10th Exam 2023 Timetable

दहावी बारावी बोर्ड परीक्षा २०२३  वेळापत्रक | SSC Maharashtra Board 10th Exam 2023 Timetable

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेतली जाणारी इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा २ मार्च २०२३ पासून सुरु होणार असून २५ मार्च ला संपणार आहे. पहिला पेपर मराठी या विषयाचा असून शेवटचा पेपर भूगोल विषयाचा असणार आहे. तर बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे.

दहावी बोर्ड परीक्षा २०२३ वेळापत्रक

बारावी बोर्ड परीक्षा २०२३ वेळापत्रक

यावर्षी च्या परीक्षेसंबंधी काही महत्वाच्या अपडेट खालीलप्रमाणे आहेत.

  • यावर्षी ८० गुणांच्या पेपरसाठी ३ तास तर ४० गुणांच्या पेपर साठी २ तासांचा कालावधी असणार आहे. मागील वर्षी ८० गुणांच्या पेपर साठी  साडेतीन तास तर ४० गुणांसाठी सव्वा दोन तासांचा कालावधी होता.
  • मागील वर्षी परीक्षा आपापल्या शाळेत होती परंतु यावर्षी बोर्डाने निश्चित केलेल्या केंद्रावर परीक्षा असेल.
  • परीक्षेसासाठी १००% अभ्यासक्रमावर प्रश्न विचारले जाणार आहेत.
  • प्रत्येक विषयासाठी ८० गुणांची लेखी परीक्षा तर २० गुणांसाठी अंतर्गत मूल्यमापन होईल