डेटाचोरी होण्यापासून वाचण्याच्या काही टिप्स
मित्रांनो एकविसावे शतक हे मोबाईल युग आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. मोबाईल च्या माध्यमातून आज एक नाही तर अनेक सुविधा आपल्या पर्यंत पोहचतात. कॅमेरा, कॅल्क्युलेटर यांसारख्या अनेक गोष्टी आहेत. इंटरनेट चा वापर मोबाईलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होतो.
हा मोबाईल कधीकधी आपल्यासाठी जसा वरदान आहे तसा शाप सुद्धा ठरू शकतो. कारण अनेक app आपण मोबाईल मध्ये वापरतो. play stoare वरून घेतलेले हे apps बऱ्याचदा तुमच्या वैयक्तिक माहितीवर लक्ष ठेवून असतात. यातून वाचण्यासाठी आपण नेहमी सावध राहणे गरजेचे आहे. आपण दक्ष राहायला हवे. खालीलप्रमाणे काळजी तुम्ही घेऊ शकता.
- कोणताही app डाऊनलोड करताना तो काही परवानगी मागत असतो. आवश्यकता असेल तरच apps ला परवानगी ध्यावी. इंस्ताग्राम किंवा इतर बऱ्याच apps ला फक्त कॅमेरा आणि gallary चीच परवानगी द्यावी. इतर कोणतीही परवानगी शक्यतो देवू नका.
- आपण कोणताही app वापरल्यावर बऱ्याचदा तो बंद न करता मिनिमाईज करतो. तर हि गोष्ट लक्षात ठेवा app वापरून झाल्यावर तो बंद करा. फक्त मिनिमाईज करू नका. नाहीतर मिनिमाईज केल्यामुळे तो aap चालूच राहतो आणि आपल्या अनेक महत्वाच्या बाबींवर तो aap नजर ठेवून असू शकतो.
- इंटरनेट वापरत असू तेव्हाच मोबाईल फोन चा डेटा सुरु ठेवा. अन्यथा बंद करा. विनाकारण मोबाईलचा डेटा सुरु ठेवू नका. रात्रीच्या वेळी शकतो झोपण्यापूर्वी डेटा बंद करा. डेटा रात्रभर चालू ठेवू नका.