इयत्ता दहावी – विषय मराठी – पत्रलेखन

इयत्ता दहावी – विषय मराठी –  पत्रलेखन

दिनांक : १ फेब्रुवारी २०२१

प्रति,

व्यवस्थापक,

आनंद पुस्तकालय,

102, विकासनगर

गळा नं. 2, जालना

विषय : शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तके मागाविण्याबद्दल

महोदय,

कालच आपल्या पुस्तकालायाची जाहिरात वर्तमानपत्रात वाचली. वाचून आनंद झाला. आपल्या शहरात आपण लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या हेतून पुस्तकांवर सवलत देण्याचा जो उपक्रम सुरु केला आहे त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे आभार.

आमच्या विद्यालयातील ग्रंथालयासाठीसुद्धा आम्ही काही पुस्तके मागविण्याच्या विचारात होतो. तितक्यात तुमची जाहिरात वाचनात आली. त्यामुळे तुम्हाला पत्र लिहित आहोत. आम्हाला जी पुस्तके हवी आहेत त्या पुस्तकांची यादी मी या पत्रासोबत जोडत आहे.  तरी ही पुस्तके आमच्या विद्यालयाच्या पत्त्यावर पाठवावी. यासोबत आम्हाला बील पाठवावा तसेच तुमच्या पुस्तके शाळेत पोच करण्याचा जो काही खर्च असेल तो सुद्धा आम्हाला कळवावा. सोबत आपल्या बँकेच्या खात्याचा तपशील पाठवावा जेणेकरून आम्ही तुमच्या खात्यात पैसे पाठवू.

आपला विशासू

ग्रंथपाल

माध्यमिक विद्यालय

गांधी चौक  – जालना

४१० २०३

पुस्तकांची यादी

1. काळे पाणी – वि. दा. सावरकर

2. गणिती – अच्युत गोडबोले

3. वाट तुडवताना – उत्तम कांबळे

4. संभाजी – विश्वास पाटील

5.गनिमी कावा – नामदेवराव जाधव