English Grammar (Tense) – इंग्रजी व्याकरण (काळ)

English Grammar – Tense (काळ)

नमस्कार मित्रांनो आज आपण इंग्रजी विषयातील काळ या भागावर चर्चा करणार आहोत. इंग्रजी किंवा कोणत्याही भाषेचा विचार केला तर तीन मुख्य काळ असतात. हे तीन काळ खालीलप्रमाणे आहते.

Present Tense – वर्तमानकाळ

Past Tense – भूतकाळ

Future Tense – भविष्यकाळ

वरील प्रत्येक काळात विभाजन हे चार काळांमध्ये होताना दिसते. यात Simple (साधा काळ), Continuous (चालू काळ), Perfect (पूर्ण काळ) आणि  Perfect Continuous (चालू पूर्ण काळ) यांचा समावेश होतो.

Present Tense – वर्तमानकाळ

Simple Present Tense – साधा वर्तमानकाळ

‘नेहमीची घडणारी क्रिया व्यक्त करण्यासाठी साधा वर्तमानकाळ वापरला जातो.’

रचना – कर्ता + क्रियापदाचे पहिले रूप + कर्म

उदाहरण 1 – He goes to School.

उदाहरण 2 – They go to school.

महत्वाचा मुद्दा – या काळात कर्ता एकवचनी असेल तर क्रियापदाला s किंवा es प्रत्यय लावतात. कर्ता अनेकवचनी असेल तर क्रियापदाला s किंवा es प्रत्यय लावला जात नाही.   

Present Continuous Tense – चालू वर्तमानकाळ

‘एखादी क्रिया वर्तमानात चालू आहे किंवा सुरु आहे हे दर्शवण्यासाठी चालू वर्तमानकाळ वापरतात’

रचना – कर्ता + am/is/are + क्रियापदाचे पहिले रूप + ing +  कर्म

उदाहरण 1 – He is going to School.

उदाहरण 2 – They are going  to school.

सहाय्यकारी क्रियापदे कशी आणि कुठ वापरणार ?

Is – कर्ता एकवचनी असताना – उदा. He, she, Radha, Sachin

am  – कर्ता I असताना  

are – कर्ता अनेकवचनी असताना – उदा. They, We

Present Perfect Tense –पूर्ण वर्तमानकाळ

वर्तमानकाळात एखादी क्रिया नुकतीच पूर्ण झालेली आहे असे दर्शवण्यासाठी पूर्ण वर्तमान काळ वापरतात

रचना – कर्ता + have/has + क्रियापदाचे तिसरे रूप + कर्म

उदाहरण 1 – He has gone to School.

उदाहरण 2 – They have gone  to school.

सहाय्यकारी क्रियापदे कशी आणि कुठ वापरणार ?

has – कर्ता एकवचनी असताना – उदा. He, she, Radha, Sachin

have– कर्ता अनेकवचनी किंवा I असताना – उदा. They, We, I 

Present Perfect Continuous Tense –पूर्ण वर्तमानकाळ

खूप पूर्वीपासून सुरु असलेली एखादी क्रिया अजूनही सुरु असेल किंवा नुकतीच संपली आहे. असे दर्शवण्यासाठी पूर्ण चालू वर्तमानकाळ वापरतात.

रचना – कर्ता + have/has + been + क्रियापदाला ing + कर्म   

उदाहरण 1 – He has been going to School.

उदाहरण 2 – They have been going to school.

सहाय्यकारी क्रियापदे कशी आणि कुठ वापरणार ?

has – कर्ता एकवचनी असताना – उदा. He, she, Radha, Sachin

have– कर्ता अनेकवचनी किंवा I असताना – उदा. They, We, I 

Past Tense – वर्तमानकाळ

Simple Past Tense – साधा भूतकाळ

‘भूतकाळात ठराविक वेळी एखादी क्रिया झाली किंवा घडून गेली असे सांगण्यासाठी आपण साधा भूतकाळ वापरतो’

रचना – कर्ता + क्रियापदाचे दुसरे रूप + कर्म

उदाहरण 1 – He went to School.

उदाहरण 2 – They went to school.

महत्वाचा मुद्दा – या काळात नेहमी क्रियापदाचे दुसरे रूप यते.  

Past Continuous Tense – चालू भूतकाळ

‘एखादी क्रिया भूतकाळात चालू होती किंवा सुरु सुरु होती हे दर्शवण्यासाठी चालू भूतकाळ वापरतात’

रचना – कर्ता + was/were + क्रियापदाचे पहिले रूप + ing +  कर्म

उदाहरण 1 – He was going to School.

उदाहरण 2 – They were going  to school.

सहाय्यकारी क्रियापदे कशी आणि कुठ वापरणार ?

Was – कर्ता एकवचनी असताना – उदा. He, she, Radha, Sachin

Were – कर्ता अनेकवचनी असताना – उदा. They, We

Past Perfect Tense –पूर्ण भूतकाळ

भूतकाळात एखादी क्रिया ठराविक वेळेपर्यंत सुरु होती हे सांगण्यासाठी आपण पूर्ण भूतकाळ वापरतो.

रचना – कर्ता + had + क्रियापदाचे तिसरे रूप + कर्म

उदाहरण 1 – He had gone to School.

उदाहरण 2 – They had gone  to school.

Past Perfect Continuous Tense –पूर्ण चालू भूतकाळ

भूतकाळात एखादी क्रिया ठराविक वेळेआधी सुरु होते आणि त्या वेळेपर्यंत सुद्धा सुरु होती असे दर्शवण्यासाठी पूर्ण चालू भूतकाळ वापरतो.

रचना – कर्ता + had + been + क्रियापदाला ing + कर्म            

उदाहरण 1 – He had been going to School.

उदाहरण 2 – They had been going to school.

Present Tense – भविष्यकाळ

Simple Future Tense – साधा भविष्यकाळ

भविष्यात एखादी क्रिया होईल असे दर्शवण्यासाठी साधा भविष्यकाळ वापरतात’

रचना – कर्ता + shall किंवा will + क्रियापदाचे पहिले रूप + कर्म

उदाहरण 1 – He will go to School.

उदाहरण 2 – They will go to school.

महत्वाचे – जुन्या नियमांनुसार I आणि We कर्ता असेल तर यानंतर shall चा वापर करत आणि इतर सर्व कर्त्यांनंतर will या क्रियापदाचा वापर करत. परंतु सध्या नव्या पद्धतीनुसार सरसकट सर्व ठिकाणी will या क्रियापदाचा वापर केला जातो.

Future Continuous Tense – चालू भविष्यकाळ

‘एखादी क्रिया भविष्यात चालू असेल  किंवा किंवा सुरु असेल  हे दर्शवण्यासाठी चालू भविष्यकाळ वापरतात’

रचना – कर्ता + shall/will + be + क्रियापदाचे पहिले रूप + ing +  कर्म

उदाहरण 1 – He will be is going to School.

उदाहरण 2 – They will be going  to school.

Future Perfect Tense –पूर्ण भविष्यकाळ

भविष्यकाळातील एखादी क्रिया ठराविक वेळेआधी पूर्ण झालेली असेल असे दर्शवण्यासाठी पूर्ण भविष्यकाळ वापरतात.

रचना – कर्ता + will have + क्रियापदाचे तिसरे रूप + कर्म

उदाहरण 1 – He will have gone to School.

उदाहरण 2 – They will have gone  to school.

Future Perfect Continuous Tense –पूर्ण चालूभविष्यकाळ

भविष्यकाळात एखादी क्रिया ठराविक वेळेत सुरु होऊन त्या वेळेतही पूर्ण झाली नसेल आणि सुरूच असेल असे दर्शवण्यासाठी पूर्ण चालू भविष्यकाळ वापरतात

चना – कर्ता + will/shall have + been + क्रियापदाला ing + कर्म

उदाहरण 1 – He will have been going to School.

उदाहरण 2 – They will have been going to school.