Uncategorized

CET पेपर लिहिताना हे या सात गोष्टी लक्षात ठेवा.. नाहीतर…?

CET पेपर लिहिताना हे या सात गोष्टी लक्षात ठेवा.. नाहीतर…?

नमस्कार मित्रांनो, इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी  CET परीक्षा होणार आहे या परीक्षेसाठी पेपर लिहिताना तुम्हाला 7 महत्वाच्या बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे. हे सातही मुद्दे तुम्ही नीट समजून घेणे गरजेचे आहे. अन्यथा नंतर तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. हे सात मुद्दे खालील प्रमाणे आहेत.  

उत्तरपत्रिकेवर उत्तराची नोंद करणे- कार्यपध्दती – सात मुद्दे


१. सदर परीक्षेसाठी O.M.R. आधारीत उत्तरपत्रिका असेल व त्यासोबत परीक्षेनंतर विद्यार्थ्यास
परत करावयाची कॉर्बन प्रत संलग्न असेल. उत्तरपत्रिकेमध्ये क्रमांक १ ते १०० प्रश्नांची उत्तरे
नोंदविण्यासाठी प्रत्येक प्रश्नक्रमांकासमोर A,B,C,D अशा चार पर्यायांचे गोल देण्यात आलेले
आहेत.


२. उपरोक्त चार पल्यापैकी विद्यार्थ्याने निश्चित केलेल्या उत्तराचा एकच गोल ठळकपणे भरावा.


३. गोल भरण्यासाठी काळया किंवा निळया यापैकी एकाच शाईच्या बॉलपेनचा वापर करावा.
तसेच सदर पर्यायी उत्तराच्या वर्णाक्षराचा गोल पूर्णपणे भरण्याची (गडद करणे) दक्षता घ्यावी.


४. अर्धवट भरलेला, खाडाखोड केलेला, एका पेक्षा जास्त भरलेले गोल तसेच गोलात अंक
अथवा तत्सम मजकूर नमूद केलेले असल्यास उत्तरांसाठी ग्राहय धरले जाणार नाही व
त्यासाठी गुणदान केले जाणार नाही. तसेच एकदा लिहिलेले उत्तर बदलता येणार नाही.


५. उत्तरपत्रिकेची संगणकीय पध्दतीने तपासणी केली जाणार असल्याने सदर उत्तरपत्रिकेची घडी
घालू नये, चुरगळू नये अथवा अन्य कोणत्याही कारणाने खराब होणार नाही याची दक्षता
घ्यावी.


६. उत्तरे लिहिण्यापूर्वी काही कच्चे काम करावयाचे असल्यास प्रश्नपत्रिकेच्या शेवटी दिलेल्या
पानांवर कोऱ्या जागेचाच वापर करावा.

७. विद्यार्थ्यास परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिकेची कॉर्बन प्रत तसेच मंडळाच्या संकेतस्थळावर
अंतिम उत्तरसूची उपलब्ध करुन दिली जाणार असल्याने निकालानंतर गुणपडताळणी अथवा
फेरतपासणीची सुविधा उपलब्ध असणार नाही.